Ad will apear here
Next
रणजितसिंग यांचा स्मृतिदिन

आज एका शूर, मुत्सद्दी, युद्धशास्त्रज्ञ, पराक्रमी, शिकारी रणजितसिंग यांचा स्मृतिदिन.
जन्म. १३ नोव्हेंबर १७८० पाकिस्तानमध्ये गेलेल्या गुजरानवाला प्रांतात. 
रणजितसिंग यांचा जन्म संधावालिया घराण्यात महाराजा सुकरचाकीया आणि राणी राज कौर यांच्या पोटी झाला. रणजितसिंग' यांचा एकंदर जीवनकाल ५९ वर्षांचा. वडिल महासिंग वारले तेव्हा रणजित केवळ १० वर्षाचा होते. 

महासिंगा यांचे वजीर लखपतराय, मातोश्री आणि भावी सासूबाई यांच्या सल्ल्याने ते राज्य करीत असत. रणजितसिंग यांना लहानपणी झालेल्या गोवर मध्ये आपल्या डाव्या डोळ्याची दृष्टी गमवावी लागली होती. रणजितसिंग यांनी गुरुग्रंथसाहिब सोडले तर आयुष्यात दुसरे कुठले पुस्तकं माहीत होते न त्यांनी कसले लिहिण्या वाचण्याचे शिक्षण घेतले होते. 

 काही बाबतीत शिवछत्रपती व रणजितसिंग यांच्यात साम्य आढळते. शिवाजी राजांनी वयाच्या १६ व्या वर्षी तोरणा किल्ला घेतला, तसेच रणजितसिंगाने वयाच्य १९व्या वर्षी लाहोर घेतले. शिवबांना अनेक सरदार व जहागीरदार व्देषाने, मत्सराने पहात होते तसेच यांनाही पहात होते. शिवबांना अन्य धमियांनी छळले तसेच यानाही. शिवबांना अनेक वेळा प्रतिपक्षीयाशी समझोता करावा लागदा तसाच यानाही करावा लागला. 

शिवबांच्या राजमुद्रेप्रमाणे रणजितसिग यांनीही "अकालसाह्य" अशी अक्षरे असलेली राजमुद्रा तयार केली होती. शिवबांची हिंदू धर्मावर श्रद्धा सभी रणजितसिंगांची शिख पंथावर असीम श्रद्धा होती. छत्रपती शिवबानी जसा स्वत: ला काही विशेष कारणासाठी राज्याभिषेक करून घेतला तसा रणजितसिग यांनीही लाहोरला मोठा दरबार भरवून 'महाराज' ही पदवी धारण केली. शिवबांचे उभे आयुष्य लढ्यात गेले नव रणजितसिंगाचेही झाले.

शिवछत्रपतीनंतर जशी अंतर्गत यादवी माजली होती तशीच रगजितसिंगानंतरही माजली होती. मराठयांमध्ये लढाऊ वृत्ती उत्पन्न करण्याचे श्रेय शिवबांना तसेच शिखांमध्येही लढाऊ वृत्ती उत्पत्र करून जोपासण्याचे काम रणजितसिगाने केले. लष्करी दरारा व शिस्त हे त्यांच्या राज्यातील विशेष होते. त्यांचे उत्तम पायदळ सुव्यवस्थित घोडदळ, चांगला तोफखाना नेहमी सुसज्ज असे.

रणजितसिगाच्या सैन्यातील तीन सेनापती वेंचुरा, अलार्ड, व बिलो हे नेपालियनच्या हाताखाली शिक्षण घेतलेले होते. रणजितसिंग अटक नदी उतरून नदीपलिकडे जाऊ लागले तेव्हा त्यांच्या गुरूने अटकेपलिकडे जाण्यास हिंदूना मनाई आहे, असा सल्ला दिला, त्यावेळी रणजितसिंग यांनी असे ठोक उत्तर दिले की, 'सब भूमि है गोपालकी इममे अटक कहां, जिससे मनके खटक रही, वोही अटक रहा।'उण्यापुऱ्या ५९ वर्षाच्या आयुष्यात उत्तर भारताचा विशाल भूभाग गुजरात, पंजाब, काश्मीर, सिंध, पेशावर, लडाख पर्यंत चा भाग हा महाराजा रणजितसिंग यांनी स्वत:च्या एकछत्री अंमलाखाली आणला होता. 

असा कारनामा करणारा महाराजा रणजितसिंग १९ व्या शतकातील एकमेव हिंदू शासक आहे. त्यांचा उल्लेख शीख संप्रदायात अत्यंत आदरपूर्वक घेतला जातो. अनेक शीख असे मानतात की शीख संप्रदाय आणि शीख साम्राज्याची शौर्यगाथा महाराजा रणजितसिंग यांच्या नावाशिवाय अधुरी आहे. 'रणजितसिंग' यांचे २७ जून १८३९ रोजी निधन झाले. रणजितसिंगांच्या मृत्यूच्या वेळी त्यांचा सन्मान म्हणून ब्रिटीशांच्या निरनिराळ्या छावण्यातून ५९ तोफांच्या (वय ५९ होते म्हणून) सलाम्या देण्यात आल्या होत्या.

संजीव_वेलणकर

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DSVBCZ
Similar Posts
बाबूराव रामजी बागुल यांचा जन्मदिन आज दलित लेखकांमधले प्रमुख साहित्यिक बाबूराव रामजी बागुल यांचा जन्मदिन. जन्म. १७ जुलै १९३० नाशिक येथे. बाबूराव बागुल मूळचे नाशिकचे. ‘वेदाआधी तू होतास...वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास...तुझ्यामुळेच सजीवसुंदर झाली ही मही...’ यासारखी मानवाचा नव्याने वेध घेणारी विद्रोही कविता लिहिणारे बाबूराव बागुल हे दलित लेखकांमधले प्रमुख साहित्यिक
संगीतकार इक्बाल कुरेशी यांचा जन्मदिन जन्म. १२ मे १९३० औरंगाबाद येथे आज इक्बाल कुरेशी म्हटले, की सर्वप्रथम आठवतो तो १९६४चा चित्रपट ‘चा चा चा!’ अभिनेता चंद्रशेखर या चित्रपटाचा नायक आणि दिग्दर्शक होता.
आज संत नामदेव यांची पुण्यतिथी जन्म. २६ ऑक्टोबर १२७० संत नामदेव यांचा जन्म शिवाजी महाराजांच्याही जवळपास चारशे वर्षं आधी. तेव्हा उत्तरेत मुस्लिम सत्ता स्थिर झाली होती. दक्षिणेत त्याचा पायरव ऐकू येत होता. धर्माच्या नावाने हिंदू धर्म मार्तंड आणि मुस्लिम शासक बहुसंख्य भारतीयांना दुय्यम दर्जाचं जिणं जगण्यास भाग पाडत होते.
गिरीश कर्नाड यांचा स्मृतिदिन आज आज नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांचा स्मृतिदिन. जन्म. १९ मे १९३८ माथेरान येथे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language